स्वच्छ, सुंदर आणि
समृद्ध खांबाळे
"परंपरेचा वारसा आणि विकासाचा ध्यास."
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि प्रगतशील गाव.
१००%
हागणदारी मुक्त
निसर्गसंपन्न आणि
संस्कृती जपणारं गाव
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले खांबाळे हे गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि एकजूटीसाठी ओळखले जाते. ग्रामविकासाच्या माध्यमातून गावाचे आधुनिकीकरण करतानाच आम्ही आमची संस्कृती आणि परंपरा जपली आहे. शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता या त्रिसूत्रीवर आमचा भर आहे.
- तंटामुक्त गाव
- १००% साक्षरतेकडे वाटचाल
- पर्यावरण पूरक उपक्रम
गावाची सांख्यिकी
एकूण लोकसंख्या
१६०८
लिंग गुणोत्तर
११७३
प्रति १००० पुरुष६५६
कुटुंब संख्या
७६%
साक्षरता
भौगोलिक क्षेत्र
५५३.६४ हेक्टर
३१
एकूण बचत गट
७
शेतकरी गट
गावचा गौरव
जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत
सन २०२१-२०२२विकासकामे आणि प्रशासकीय सुधारणांसाठी जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार
सलग ५ वर्षे (२०१८-२०२२)स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनात सातत्यपूर्ण कामगिरी.
तंटामुक्त व निर्मल ग्राम
सन २०११-१२शांतता आणि सामाजिक एकोपा राखल्याबद्दल सन्मान.
स्थानिक उद्योग
Featured
कोकणस्वाद काजू उद्योग
मोहितेवाडी, खांबाळे
श्री. दीपक शंकर चव्हाण यांनी सुरू केलेला हा उद्योग रोजगार निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. येथे उच्च प्रतीचे कोकणी काजू प्रक्रिया केले जातात.
संपर्क करा